Home » Uncategorized » 13.91 कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा; अद्याप आरोपी फरार – अटक नाही

13.91 कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा; अद्याप आरोपी फरार – अटक नाही

Facebook
X
WhatsApp
Telegram

13.91 कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा; अद्याप आरोपी फरार – अटक नाही

नवी मुंबई, प्रतिनिधी :
नवी मुंबई परिसरात अनधिकृत इमारतींमधील दस्तांची बेकायदेशीर नोंदणी करून शासनाच्या तिजोरीला सुमारे १३ कोटी ११ लाख रुपयांचा मुद्रांक शुल्काचा फटका दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी मुख्य आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती समोर आली आहे.

प्राथमिक तपासात असे आढळून आले की, अनधिकृत इमारतींमधील सुमारे १४४ दस्तांची बेकायदेशीर नोंदणी करण्यात आली. या नोंदणीदरम्यान मुद्रांक शुल्क कमी आकारून शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडवण्यात आला. या प्रकारामुळे राज्य शासनाच्या महसूल विभागाला मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात शासनाने कारवाईचे निर्देश दिल्यानंतर तुर्भे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन प्रभारी सह दुय्यम निबंधक,राजकुमार दहिफळे व दस्त नोंदणी एजंट योगेश चव्हाण आणि इतर संबंधितांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तपासादरम्यान नोंदणी प्रक्रियेत भारतीय नोंदणी अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचेही समोर आले आहे. अधिकृत परवानगी नसलेल्या इमारतींमधील दस्तांची नोंदणी करून कमी मुद्रांक शुल्क आकारण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, इतका मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतरही प्रमुख आरोपी अजूनही फरार असल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महसूल विभागाला कोट्यवधींचे नुकसान करूनही संबंधितांना अटक का करण्यात आलेली नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, घोटाळ्याच्या गंभीरतेच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर अटक होणे अपेक्षित असल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.

(अपडेट : आरोपींचा शोध सुरू असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.)

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market