नवी मुंबईत बिनधास्त हुक्का पार्लर सुरू; पोलिसांचा छापा, तरीही शहरात अनेक ठिकाणी धडाक्यात व्यवसाय
नवी मुंबई : शहरात हुक्का पार्लरवर बंदी असतानाही काही रेस्टॉरंट आणि कॅफेमध्ये बिनधास्तपणे हुक्का सेवा सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. वाशी परिसरातील ग्रीनस्केप इमारतीतील प्रसिद्ध हाऊस ऑफ लॉर्ड्स रेस्टॉरंटमध्ये गुप्तपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर वाशी पोलिसांनी रविवारी उशिरा रात्री छापा टाकत कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना बेकायदेशीररित्या हुक्का पुरविला जात…