Home » Uncategorized » बनावट कागदपत्रांनी हडप योजनेंत घोटाळा? एकाच वेळी तीन विभागांची फसवणूक

बनावट कागदपत्रांनी हडप योजनेंत घोटाळा? एकाच वेळी तीन विभागांची फसवणूक

Facebook
X
WhatsApp
Telegram

बनावट कागदपत्रांनी हडप योजनेंत घोटाळा? एकाच वेळी तीन विभागांची फसवणूक


नाशिक / प्रतिनिधी :
शासनाच्या घरकुल व विकास योजनांमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करून मोठा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात जमीन मालक, विकासक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची दिशाभूल करून जमीन व्यवहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

माहितीनुसार, शासनाने २०१३ मध्ये घरकुल व सर्वसमावेशक विकासासाठी काही जमीन राखीव ठेवली होती. मात्र या जमिनीवर नियमबाह्य पद्धतीने कागदपत्रे तयार करून व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित जमिनीचे क्षेत्र ४००० चौ.मी. पेक्षा अधिक असल्याने नियमानुसार विविध विभागांची परवानगी आवश्यक होती. तरीदेखील बनावट कागदपत्रे तयार करून व्यवहार केल्याची चर्चा सुरू आहे.

या प्रकरणात महसूल विभाग, नोंदणी विभाग आणि महाराष्ट्र शासन यांची एकाच वेळी फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, जमीन मालक, विकासक आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून प्राथमिक तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची प्रक्रिया सुरू असून संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.

तसेच, भूमी अभिलेख कार्यालयातील बनावट सही व शिक्क्यांचा वापर करून खोटी नोंदणी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. जर आरोप खरे ठरले तर हा घोटाळा अनेक कोटी रुपयांचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(या प्रकरणातील अधिक माहिती आणि कागदपत्रे समोर येण्याची शक्यता असून तपासानंतर आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.)

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market