Uncategorized

कोपरखैरणे पोलीस स्टेशन API सागर टकले व प्रज्ञेश कोठेकर ACB च्या जाळ्यात..

लाचेची मागणी ₹-1,00000/-लाच स्वीकारली ₹-40,000/-

यशस्वी सापळा कारवाई :-
युनिट :-नवी मुंबई.

आरोपी :-
1)-सागर कुमार टकले, वय वर्ष 37 वर्ष. सहाय्यक पोलीस निरीक्षक, कोपरखैरणे पोलीस स्टेशन, नवी मुंबई.

2)-प्रज्ञेश नरेंद्र कोठेकर, वय 42 वर्ष (पो. ना. क्र. 2044)नेमणूक कोपरखैरणे पोलीस स्टेशन नवी मुंबई.

कर्तव्य :-कोर्ट पैरवी कर्मचारी.

लाचेची मागणी :-1,000,00/-तडजोडी अंती 40,000/-रुपये.
लाच स्वीकारली -40,000/-रुपये.
हस्तगत रक्कम :-40,000/-
लाचेची मागणी :-पडताळून केली.

दिनांक :-30/05/2024 आणि 04/06/2024.

लाचेचे कारण :-
या मधील तक्रारदार यांचे चुलते यांच्यावर कोपरखैरणे पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेले चुलते यांचे पोलीस कोठडी मुदत संपल्यावर जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान “say” दाखल करण्याकरिता तसेच उर्वरित गुन्ह्यात तपासात मदत करण्याकारिता तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार झाली होती. त्या अनुषंघाने केलेल्या पडताळणी दरम्यान तडजोडी अंती 40,000/-रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पुढील कार्यवाही दरम्यान आरोपी क्र -2 कडे रक्कम देण्यास सांगितले. त्यानुसार केलेल्या सापळा कारवाई दरम्यान प्रज्ञेश कोठेकर यांस रंगेहात पकडण्यात आले. व ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात येत आहे.

सापळा अधिकारी :-पो. नि. संतोष पाटील.
पर्वेक्षण अधिकारी :-शिवराज जगदीश म्हेत्रे, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. नवी मुंबई.

सक्षम अधिकारी -मा. पोलीस आयुक्त नवी मुंबई.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे.
टोल फ्री क्र -1064.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button