क्राइम

महिलेची झडती घेतल्याने कोपरखैरणे पोलीस स्टेशन चे तीन पुरुष पोलीस निलंबित…

महिलेच्या आरोपानंतर पंकज डहानेनी दाखविला हिसका...

* महिलेच्या आरोपा नंतर केली कारवाई...

* नवी मुंबई :-गांजा विक्रीचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून महिलेची झडती घेतल्या प्रकरणी तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कोपरखैरणे परिसरात हा प्रकार घडला असून, त्यानंतर महिलेनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. त्याद्वारे तिघांचे निलंबन करून सहाय्यक पोलीस आयुक्ता मार्फत चौकशी करण्यात आली.

* कोपरखैरणे येथील तीन टाकी पोलीस चौकीत हा प्रकार घडला. बोनकोडे परिसरात राहणाऱ्या महिलेने तीन पुरुष पोलिसांनी आपली झडती घेतल्याचा आरोप केला आहे.

* गुन्ह्यात अडकविण्याची भीती *
शिवाय गांजा विक्रीच्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून पैसे घेतल्याचा तिचा आरोप आहे. 21 मे रोजी या महिलेला पोलीस चौकीत आणले होते. त्या ठिकाणी पोलीस नाईक सचिन दळवी, लहू ठाकूर व गणेश शिरसाठ यांनी आपली झडती घेतल्याचा तिचा आरोप आहे. शिवाय गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून पैसे मागून ते स्विकारल्याचा ही आरोप केला आहे.

* सारे काही आर्थिक स्वार्थासाठी *

#-कोपरखैरणे पोलिसामार्फत अमली पदार्थ विरोधात कारवाईचा धडाका सुरु आहे. त्यामुळे परिसरातील छोटे मोठे अमली पदार्थ विक्रेते हद्दीला लागून असलेल्या भागातून अमली पदार्थ विक्री करत आहेत.

#-त्यातूनच संबंधित पोलिसांनी आर्थिक स्वार्थासाठी हा प्रकार केल्याची चर्चा
परिसरात रंगली आहे. मात्र त्त्यांच्या हया कृत्याने पुन्हा एकदा पोलिसांच्या प्रतिमेला डाग लागला आहे.

*पंकज डहाणेनी दाखविला हिसका….
महिलेने पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. सहाय्यक आयुक्ता मार्फत प्रकरणाची चौकशी केली असता तिघांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश गावडे यांच्यामार्फत झाली असून, त्याचा अहवाल वरिष्टाकडे सादर केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button