क्राइम

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला “सुपारी “नडली…..

सुपारी अग्निकांड प्रकरणी सतीश निकम यांची उचलबांगडी...

नवी मुंबई :-उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांची तडकाफडकी उचल बांगडी करून त्यांना कंट्रोल रूम ला बसविण्यात आले. उरण मध्ये घडलेल्या 18 कोटी रुपयांच्या सुपारीच्या अग्निकांडा मधील मुख्य आरोपी ची पाठराखण त्यांना नडल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. दरम्यान हा तपास गुन्हे शाखे कडे वर्ग केला असून त्यांनी हया प्रकरणी एकाला अटक केली आहे.

* उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांची गुरुवारी रात्री तडकाफडकी उचल बांगडी करून त्यांना कंट्रोल रूम ला बसविले आहे.
* यामागचे कोणतीही ठोस कारण अधिकाऱ्याकडून स्पष्ट केले जात नसले तरी त्यांना सुपारी प्रकरण भोवल्याचे गुन्हे शाखेच्या तपासा वरून दिसून येत आहे.
* निकम यांच्या जागी नाव्हा शेवाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांची नियुक्ती केली आहे.
* पनवेल शहर निरीक्षक अंजुम बागवान यांची नाव्हा शेवा येथे बदली केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button