क्राइम

घणसोली “उद्धवसेना गटात हाणामारी “……..

दोन गटात घणसोलीत हाणामारी.

नवी मुंबई :-उद्धव सेनेच्या दोन गटात हाणामारीची घटना घणसोलीत घडली. एक गट राजन विचारेचा प्रचार करत असताना दुसऱ्या गटाने थांबाविण्यास सांगितल्याने वाद झाला. दुसऱ्या गटाने व्हाट्सअँप ग्रुप वरील मेसेज डिलीट केल्याचा जाब विचारून वाद घातल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी दोन्ही गटावर गुन्हा दाखल केला आहे.

घणसोली सेक्टर -5 येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली. उद्धवसेनेचे उप विभाग प्रमुख राजू गावडे व युवा सेनेचे पदाधिकारी संतोष आसबे यांच्या गटात हाणामारी झाली. आसबे आणि इतर राजन विचारे यांचा प्रचार करत असल्याचा आक्षेप घेतल्याने आपल्यावर हा हल्ला झाल्याचा त्त्यांचा आरोप आहे. तर व्हाट्सअँप ग्रुप वर गावडे यांचा मॅसेज ऍडमिन ने डिलीट केल्याने गावडे यांनी हल्ला केल्याचा आरोप आसबे गटाने केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button