भ्रष्टाचार
वाशीतील हुक्का पार्लर वर कारवाई : तिघांवर गुन्हा दाखल…….
वाशीतील बहूचर्चित हुक्का पार्लर हाऊस ऑफ लॉर्ड यावर अखेर पोलिसांनी कारवाई केली !
नवी मुंबई :-वाशीतील बहुचर्चित हुक्का पार्लर,हाऊस ऑफ लॉर्ड यावर अखेर!पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी तिघांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वाशी सेक्टर -31 येथे इमारतीच्या मोकळ्या भागात हाऊस ऑफ लॉर्ड ही आस्थापना चालवली जात आहे. त्याठिकाणी,पहाटे पर्यंत ग्राहक जमवून हुक्का ओढण्याची सौय उपलब्ध करून दिली जात आहे.
यानंतर वाशीतील “पाटील”की गाजवीणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याकडून अशा अवेध धंदयातून “माया “मिळविण्याचे काम जोरात सुरु आहे. अखेर हाऊस ऑफ लॉर्ड आस्थापना विरोधात वाढत्या तक्रारी मुळे रविवारी पहाटे त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी निजामउद्दीन अरिफ (30) व स्वप्नील शिंदे (30) यांच्यावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.