भ्रष्टाचारक्राइम

पाच हजारांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी श्रीनिवास घुगे यांना रंगेहात पकडले?

जालना- तालुक्यातील मौजे कारला येथील एका शेतकऱ्याला घरकुलासाठी 600 चौरस फुटाची जागा नमुना आठ अ मध्ये फेरफार करून नोंदविण्यासाठी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना श्रीनिवास आनंदराव घुगे ,वय 52 , ग्राम विस्तार अधिकारी पंचायत समिती जालना ,वर्ग तीन, राहणार माऊली नगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज रंगेहात पकडले.

या प्रकरणातील तक्रारदाराने रीतसर अर्ज केल्यानंतर काल दिनांक आठ रोजी तक्रारदाराला आणि त्याच्या एका साक्षीदाराला श्रीनिवास घुगे यांनी साडेसात हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी आणती पाच हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदार आज घुगे यांच्या माऊली नगर येथील निवासस्थानी गेला आणि लाचेची रक्कम दिली. ही रक्कम देताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी श्रीनिवास घुगे यांच्यावर छापा मारला आणि रोख रकमेसह घुगे यांना ताब्यात घेतले आहे.
पुढील तपास सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button