क्राइमदेश

भ्रष्टाचाराचा कळस…!!!!!!

माहिती च्या अधिकारातून उघड झाली धक्कादायक बाब....

प्रतिनिधी :- माहिती च्या अधिकारातून मागितलेल्या माहिती मध्ये सदर बांधकामाला कोणतीही बांधकाम परवानगी दिली गेली नाही कि बांधकाम पूर्णतःवाचा दाखला दिला नाही. तरीही सदर इमारतीला वीज जोडणी, पाण्याचे कनेकशन, मल :निसारण जोडणी देण्यात आली आहे.

: माहिती च्या अधिकारातून उघड झाली धक्कादायक बाब….

सर्वसामान्य माणसाने काही काम काढले तर महानगर पालिका अनेक पेपर ची मागणी करते,पण सदर इमारती कडे महानगर पालिकेने पूर्ण दुर्लक्ष केले आहे.सदर इमारतीला पाणी पुरवठा मल : निसारण जोडणी देण्यात आली आहे.

नगर रचना विभाग नवी मुंबई महानगर पालिका यांच्याकडे सदर बांधकामा बद्दल माहिती मागितली असता सदर माहिती अभिलेखात उपलब्ध नाही असे उत्तर देण्यात आले.

सदर अनधिकृत बांधकामाला नवी मुंबई महानगर पालिकेकडून कर आकारणी सुद्धा केली जात आहे.

घणसोली एफ विभाग यांच्या कार्यक्षेत्रात प्लॉट -340 सेक्टर -4 ह्या जागेवर अनधिकृत इमारत बांधली आहे, सदर मालकाने कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button