क्राइमदेश

रबाळे गोठीवलीतील पाच मजली इमारती वर अखेर हातोडा….

वाहने आडवी लावून कारवाईत अडथळा आणण्याचा प्रकार.

शासकीय नियम धाब्यावर बसवून गोठीवली सेक्टर -30 येथे सिडको च्या मोकळ्या भूखंडावर बेकायदेशीर उभारण्यात आलेल्या पाच मजली टोलेजंग इमारती वर गुरुवारी अखेर सिडको आणि महानगर पालिका यांच्या संयुक्त पथकाने पोखलेन च्या साह्याने अखेर हातोडा मारला.

गोठीवली सेक्टर -30 येथील या इमारती वर कारवाई दरम्यान इमारतीचे विकासक किंवा परिसरातील गुंड विरोध करण्याची श्यक्यता होती. आणि झाले तसेच कारवाईची माहिती मिळताच काही जणांनी आपले वाहने आडवी लावून कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अतिक्रमण विभागाचे प्रमुख श्री :-रोहित ठाकरे हे परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून होते. तसेच कारवाई साठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे ही कारवाई यशस्वी रित्या पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button